सोमवार, ७ मार्च, २०२२

महामाया महिषासुरमर्दिनी

सिंधू संस्कृतीत भूमातेला रेडा बळी देण्याची प्रथा

 
रुक्मिणी मंदिरातील बुद्धमूर्ती

नालंदा जवळील जगदिशपूर येथील भूमीस्पर्श बुद्ध मूर्ती चा खालचा भाग. ज्याच्या खालच्या डाव्या सेक्शन मध्ये कोपऱ्यात मार बुद्धाना मारताना दाखवला आहे. बाजूच्याच दुसऱ्या सेक्शन मध्ये दोन कथा दाखवणाऱ्या घटना आहेत. पहिली घटना बुद्ध जन्माची आहे. मायेला प्रसूती वेदना झाल्यानंतर ती एका वृक्षाच्या फांदीला पकडतेय असा भास व बाजूला तिच्या सहकारी प्रसूती कळा होत असताना तिला सांभाळताना. त्याच सेक्शनमध्ये बाजूला मायेचं महिषासुरमर्दिनी रूप. सिंधू संस्कृती काळापासून भूमातेच्या प्रसवण्याच्या उत्सवात रेडा बळी दिला जात असे. सिंधू संस्कृतीत ती देवी कोणत्या गणाची होती हे ज्ञात नाही. पण प्रत्येक गणात एक अशी भूमाता मानली गेली व तिला असा बळी दिला गेला. हिंदू धर्मानुसार माया अश्विन शुद्ध दशमीला म्हणजे दसर्याला प्रसूत झाली व तिने बुद्धाला जन्म दिला. त्यावेळच्या परंपरेप्रामाणे कोली शाक्य गणाची भूमाता म्हणून तिला रेड्याचा बळी दिला गेला. तीच प्रथा आजही काही ठिकाणी दसर्याला रेडा बळी देऊन केली जाते. महिषासुर व महिषासुरमर्दिनी हिंदू धर्मात अश्या प्रकारे प्रकट झाले आहेत



गुरुवार, ३ मार्च, २०२२

रुक्मिणी देवी म्हणजेच महामाया

 


नालंदा जवळील जगदिशपूर मधील ही भूमीस्पर्श मुद्रेतील प्रतिमा. ही मूर्ती ज्या मंदिरात आहे. त्या मंदिरात ही मूर्ती रुक्मिणी देवी या नावाने पुजली जाते. या रुक्मिणी देवी मंदिराबद्दल कथा ही कृष्ण कथेतील रुक्मिणीशी केली जाते. भूमीस्पर्श मूर्तीच्या खाली जी प्रतीके आहेत ती रुक्मिणी मातेची असून ती कृष्ण कथेतील रुक्मिणी मानली जाते. हा गोंधळ निर्माण व्हायला प्रमुख कारण बुद्ध चरित्रातील रुक्मिणी या दोन नावातील साम्य. अशोकाने बुद्ध जन्माच्या ठिकाणी जो स्तंभ उभारला ते ठिकाण रुमिनी देई आहे. बुद्धाची माता त्या ठिकाणी रुमिनी देई या नावाने पुजली जाते. रुमिनी हे नाव रुक्मिणी या शब्दाचा अपभ्रंश आहे. मार जेव्हा बुद्धाला विचारतात तुला साक्षी कोण आहे तेव्हा तो भूमीला स्पर्श करून सांगतो ही भूमाता मला साक्षी आहे. बुद्धाच्या मातेला भूमाता म्हणून या काळापर्यंत स्वरूप प्राप्त झाले होते. म्हणून या भूमीस्पर्श मुद्रेच्या खाली महामाया रुक्मिणी देवी चे प्रतीक आहे. आणि तिच्यावरूनच ही मूर्ती ज्या मंदिरात आहे त्या मंदिरात ही मूर्ती रुक्मिणी देवी या नावाने पुजली जाते. 

महामाया महिषासुरमर्दिनी

सिंधू संस्कृतीत भूमातेला रेडा बळी देण्याची प्रथा   रुक्मिणी मंदिरातील बुद्धमूर्ती नालंदा जवळील जगदिशपूर येथील भूमीस्पर्श बुद्ध मूर्ती चा खाल...