बुधवार, १५ डिसेंबर, २०२१

करणीबाधा - सत्य की अंधश्रद्धा ?????




समाजातील बहुतांश लोकांचा करणी बाधेवर विश्वास असतो. तर समाजातील मोठा वर्ग असा आहे की जो करणी सारख्या प्रकरणाना अंधश्रद्धा म्हणवून उडवून लावतो.

मी साधारणतः जादू टोण्यावर विश्वास नसणारा मनुष्य आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने जादू टोण्याने माणसाचं काही वाईट होत असेल असे मला अजिबात वाटत नाही.

आता तुम्ही म्हणाल की तुझा जादूटोण्यावर विश्वास नाही तर तू या विषयावर का लिहितोस. ? प्रबोधन घडवण्यासाठी ??? की लोकांना अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी. ? की मग फक्त करणीला अंधश्रद्धा ठरवण्यासाठी ???

नाही असं काही नाही. मला असं काही सिद्ध करायचं नाहीये. मला फक्त अनुभव आणि त्यावरून माझी निर्माण झालेली मत तुमच्या पुढे फक्त ठेवायची आहेत. कारण जे मी भोगलोय जे माझ्यासोबत घडलंय त्यातून इतर जण शहाणे व्हावे असे मला वाटते.

जातपंचायतीमधील पूर्वीपासूनचा वाद -

जातपंचायत ही भारतीय राज्यघटनेमुळे कालबाह्य झालेली संस्था असली तरी समाजात मात्र तीच वर्चस्व अबाधित आहे. जात पंचायतीला डावलून किमान गावामध्ये आपणास राहता येणं कठीण आहे हे सर्वच जाणतात. त्यामुळे कितीही मोठा मनुष्य असला तरी त्याला जात पंचायतीसमोर नमते घेणे भाग आहे.

अशीच आमच्या जातपंचायतीची कथा अशीच आजोबांच्या काळापासून आमच्या जातपंचायतीत आमचे वाद होते. वडिलांचं लग्न शहरात झाल्याने व मुलीकडच्या लोकांनी सहकार्य केल्यामुळे फारशी जातपंचायतीच्या बहिष्काराची आडकाठी आली नाही. मात्र या मधल्या काळात कौटुंबिक वाद आत्येने जातपंचायतीत न्हेले. त्यामुळे जात पंचायत आणि वडील यात वाद वाढत गेले. एका बाजूला पूर्ण जात विरुद्ध वडील असा सामना रंगला. वडील साधे होते. ते जशास तसे उत्तरे देऊ शकले नाहीत. जातपंचायतने सुद्धा वडिलांना नमवण्यासाठी व नुकसान करण्यासाठी काही कारणे दाखवून आर्थिक व मानहानीकारक दंड ठोठावला. वडिलांनी सुद्धा मुलाच्या लग्नात आडकाठी येऊ नये म्हणून तो पूर्ण केला. पण लग्नात जात पंचायत चूप राहिली नाही. त्यांनी प्रचंड धिंगाणा हळदी कार्यक्रमात केला. तेथून वादाची खरी सुरुवात आहे.

हळदी कार्यक्रम शहरात असल्याने आणि जात पंचायतीने धिंगाणा घातल्याने. आमच्या बाबत सहानुभूती निर्माण होऊन शहरातील सुशिक्षित इतर जात धर्मीय मंडळी ने त्यांना हळदी कार्यक्रमातून हाकलून दिले. जात पंचायतीचे काही लोक हल्ले करत असता त्यांनाही प्रतिहल्ले करत इतर समाज मंडळीने हाकलून लावले.

यावादात ज्या जातपंचायतमधील एका मुलाला फटके बसले त्यामुळे त्याचे कुटुंबीय आमच्यवर नाराज झाले आणि त्यांनी आमच्यावर राग (डूख) धरला

आत्याशी मिळून करणीचा प्रयोग -

आत्येचा आणि आमचा वाद होताच. वादाचे कारण म्हणजे प्रॉपर्टी आणि द्वेष.
ज्या मुलाला हळदीत फटके बसले होते त्याच्या वडिलांनी आत्येशी मिळून किमान तीन-चार वेळा करणीचा प्रयोग माझ्यावर केला. इतर कुटुंबावर केला का माहीत नाही. कदाचित केला असावा. कारण जी लक्षणे मी माझ्यात पाहिली ती वेगवेगळ्या काळी मी त्यांच्यात पाहिली. जेव्हा हे सर्व समजून चुकले तोपर्यंत आजचा दिवस उजाडला होता.

करणी म्हणजे काय ???

करणी म्हणजे अशी क्रिया जी जादू टोना आहे अशी सांगितली जाते व त्यात लिंबू लाल कपडे असा वापर करत असले तरी माझ्या दृष्टीने करणीत वापरात येणारी ही हत्यारे उपयोगाची नाहींत. त्याचे कारण मी वरच सांगितल्यामुळे कोणत्याही जादूने कोणत्याही मनुष्याला कोणताही अपाय होत नाही. अशी माझी धारणा आहे.

पण मला करणीचा अपाय का झाला ????

माझा करणीतील जादू टोण्यावर विश्वास नाही. असे मीच म्हणतोय आणि तरीही मला अपाय झाला असेही मी सांगतोय. हे जरा विचित्र वाटत असेल ना ???

नाही यात विचित्र अस काही नाही. करणीत लिंबू लाल कपडे या गोष्टींचा अपाय जरी होत नसला तरी तुम्हाला अन्नातून किंवा चाय मधून एखादी जडिबुटी टाकून करणी केली असेल तर त्याचा अपाय होतो. त्याचे कारण ही जडिबुटी म्हणजे विषारी रानटी वनस्पती चा चुरा असतो. ज्याचे ज्ञान त्या त्या क्षेत्रातील तांत्रिकाला असते. कोनती जडिबुटी चाय मधून दिल्यावर काय परिणाम किती दिवसात होईल याचे ज्ञान त्याला असते.

हे संक्रमण चाय मधून शरीरात गेल्यावर त्याव्यक्तीला आजार जडतो. हे नेहमीचे संक्रमण नसल्यामुळे डॉक्टरही त्यावर लागू पडतील असे औषधे लगेच देउ शकत नाही. संक्रमण नेमके कोणते आहे हे शोधण्यात त्याला प्रचंड वेळ जातो. (श्रीमंत व्यक्तीच तो सर्व टेस्ट करून लवकर शोधू शकेल)तो पर्यंत शरीराचे प्रचंड नुकसान झालेले असते. आणि ती व्यक्ती एकमेव जर कमवणारी असेल तर घर दरिद्री बनते. हीच असते खरी करणीबाधा.

हा प्रयोग माझ्यावर किमान तीनवेळा झाला आहे. पहिल्या प्रयोगात मी सहा महिने आजारी पडलो होतो. कान घसा इन्फेक्शन झाले होते. लिव्हर ला इन्फेक्शन झाल्यामुळे कावीळ झाली होती. लघवीच्या जागी चामडी निघणारे इन्फेक्शन झाले होते. माझी चांगली नोकरी गेली. त्यावेळी मला हे कळालच नाही की अन्नामधून हे स्लो पोईजन मला दिल गेलं आहे. कारण ते लगेच रिऍक्ट करत नाही काही दिवसात ते शरीरभर पसरते. व शारीरिक त्रास देते.
  मला  काही वर्षांनी पुन्हा हा प्रयोग करण्यात आला त्यावेळी लघवीच्या जागी चामडी निघणार इन्फेक्शन झालं त्याच बरोबर. जठरातून स्किन रिमुव्ह होऊन ब्लड निघणार इन्फेक्शन झालं

आज हा ब्लॉग लिहिताना माझ्या शरीरावर करण्यात आलेला तिसरा किंवा चौथा प्रयोग आहे. काही दिवसांपूर्वीच आत्येकडे चाय प्यायल्याने हा infection उदभवला आहे. चाय प्यायल्याच्या दुसऱ्या दिवशी जुलाब लागले.
आता infection वाढीची सुरुवात होतेय. लघवीच्या जागी skin remove होण्याची सुरुवात झालेली आहे. काही दिवसात किंवा महिन्यात पोटातील skin remove होऊन ब्लड चालू होईल अशी मला शक्यता वाटतेय.

करणी म्हणजे नक्की काय ? हे माझ्या अनुभवावरून तुमच्या लक्षात आले असेल ना ?


खरेतर मी ही गोष्ट इथे लिहिण्यापेक्षा पोलिसात तक्रार द्यायला हवी होती. पण अशी घटना पोलिसांसमोर आली असेल काय ???? नसेल तर माझी तक्रार ते स्वीकारतील काय ??? या प्रश्नांनी माझे मन द्विधा स्थितीत आहे.

तरीही आजार जर गंभीर रूप धारण करणार असेल तर मात्र मला पोलिसात किमान ही गोष्ट कळवावी लागेल. कदाचित यामुळे माझे इतर कुटुंबीय व इतर लोक सुरक्षित होतील.

महामाया महिषासुरमर्दिनी

सिंधू संस्कृतीत भूमातेला रेडा बळी देण्याची प्रथा   रुक्मिणी मंदिरातील बुद्धमूर्ती नालंदा जवळील जगदिशपूर येथील भूमीस्पर्श बुद्ध मूर्ती चा खाल...